‘सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स’च्या ऑडिशन्समध्ये सहभागी होण्याची संधी!

‘सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स’च्या ऑडिशन्समध्ये सहभागी होण्याची संधी!

गेल्या आवृत्तीतील स्पर्धक पिकोसा मोहरकरने केले नव्या आवृत्तीच्या ऑडिशनमध्ये सहभागी होण्याचे नागपूरमधील गुणी स्पर्धकांना आवाहन

नागपूर, 20 जानेवारी : लहान मुलांमधील गायनगुणांचा शोध घेणार्‍्या ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स’ या स्पर्धा कार्यक्रमाची नवी आवृत्ती आता सुरू होणार आहे. त्यात देशभरातून सहभागी होणार्‍्या लहान मुलांनी आपल्या गोड आवाजात सादर केलेल्या लोकप्रिय गाण्यांच्या धमाकेदार सादरीकरणामुळे या कार्यक्रमाने टीव्हीवर जबरदस्त लोकप्रियता संपादन केली आहे. आपल्यातही असे गायनगुण असून आपण नवा लिटिल चॅन्प बनू शकतो, अशी खात्री तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आता आता उपलब्ध झाली आहे. तुम्ही तुमच्या शहरातील जवळच्या ऑडिशन्स केंद्रावर जाऊ शकता. या कार्यक्रमाच्या अखेरच्या आवृत्तीत सुगंधा दातेची लिटिल चॅम्प म्हणून निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमाने देशाला श्रेयन भट्टाचार्य, अंजली गायकवाड, तान्या शर्मा, षण्मुखप्रिया, सोनाक्षी कर आणि सर्वांचा लाडका ‘छोटे भगवान’ जयस कुमार यांच्यासारखे लहान गायक दिले आहेत.
आता लहानपणीच सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या लहान मुलांमधील भावी गायकांचा शोध घेण्याची या कार्यक्रमाची परंपरा पुढे चालविण्यासाठी या कार्यक्रमाने आता पुढील आवृत्तीतील नव्या स्पर्धकांसाठी ऑडिशन फेरी घोषित केली आहे. या ऑडिशन्स देशाच्या विविध शहरांमध्ये घेतल्या जातील. नागपूरमधील ऑडिशन गुरुवार, 23 जानेवारी रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूल, भंडारा रोड, बगडगंज, नागपूर, महाराष्ट्र- 440008 या पत्त्यावर घेतली जाईल.

अर्थात ज्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली असेल, अशा मुलांनाच या ऑडिशनमध्ये सहभागी होता येईल. त्यामुळे आपल्या मुलामध्ये देशातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकून नवा लिटिल चॅम्प बनण्याची क्षमता आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या 15 वर्षांपर्यंतच्या मुलाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी 7304189194/ 8828290291 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

नागपूरमधील भावी आणि गुणवान गायकमुलांना उत्तेजन देताना पिकोसा मोहरकर म्हणाला, “‘सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स’ हा भारतातील टीव्ही वाहिन्यांवरील सर्वात आवडता गाण्यांचा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम असून त्याने माझ्यासारख्या अनेक होतकरू गायकांच्या कारकीर्दींना आकार दिला आहे. या कार्यक्रमाने मला गाण्याचा खरा अर्थ सांगितला आणि गायनकलेतील अनेक बारकावे आणि खुब्या मला शिकविल्या. या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे मला जो अनुभव मिळाला आणि मला जो व्यापक प्रेक्षकवर्ग लाभला त्याचं मोल करता येणार नाही. आता या तार्यक्रमाच्या नव्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी नागपूरमधल्या होतकरू आणि गुणी गायक बालकांना त्याच्या ऑडिशनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्याची संधी मला मिळत असल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या शहरातील सर्व गुणी गायकांनी या ऑडिशन्समध्ये सहभागी व्हावं, असं मी आवाहन करतो.”

येत्या काही दिवसांत मुंबईमध्ये नव्या ऑडिशन्स घेतल्या जातील.

लहान गुणी गायकांना आपल्या सुरेल आवाजात गाताना पाहा ‘सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स’मध्ये लवकरच फक्त ‘झी टीव्हीवर!

error: Content is protected !!