डॉ. नितीन राऊत यांनी अश्या सरकार मध्ये राहू नये !..

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा डॉ. राऊत यांना सल्ला

नागपूर: आंबेडकरी चळवळीचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री, नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननिय डॉ. नितीन राऊत साहेब यांना महाविकास आघाडी सरकार मध्ये सन्मान मिळत नाही. त्यांच्या मागणीला सरकार केराची टोपली दाखविते. म्हणून माझा डॉ. नितीन राऊत यांना सल्ला आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडावे. आणि बदनामी होण्यापासून वाचावे, असा सल्ला माजी मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. नितीन राऊत यांना दिला. नागपूर प्रेस क्लब येथील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते.

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी मध्ये महाविकास आघाडी सरकार आपली संपूर्ण ताकद लावत आहे. पण भाजप ने रिंगणात उतरविलेला तरुण, तडफदार व पदवीधरांना न्याय देणारे संदिप जोशी हे ७० टक्के पदवीधरांची पहिली पसंती असल्यामुळे भाजपच्या संदिप जोशी यांचा विजय निश्चित होणार असल्याचा ठाम विश्वास बावनकुळे यांनी दिला.

राज्याची महाविकास आघाडी सरकार शेतकरी, पदवीधर, बेरोजगार यांच्या तोंडाला पान पुसणारी सरकार आहे. गेल्या ५० वर्षांपासून पदवीधरांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व भाजपच करते आहे. पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिषदेत आवाज उठविणारा फक्त भाजपचाच आमदार असतो, असे ही बावनकुळे म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!