सिंधू महाविद्यालयात मराठी भाषा दिवस साजरा

नागपूर : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून दादारामचंद्र बाखरु सिंधू महाविद्यालयाच्या वतीने मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. सतीश तेवानी, उप प्राचार्य डॉ. आनंद थदानी उपस्थित होते.

मराठी भाषेचे महत्व आमच्या दैनंदिन जिवनात कसे आहे, हे अतिथिंनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अर्पणा चौव्हाण तर डॉ. पिंकी सोनारघरे यांनी आभार मानले.

यावेळी प्रा. संघमित्रा रामटेके (शिंपी), प्रा. रोशनी पाटील (लोणारे), डॉ. खापेकर, डॉ. शिनखेडे, डॉ. सुचिता वाघाये, डॉ. हिवरकर, डॉ. भारती अनेराव यांनीही मराठी भाषेवर आपले विचार मांडले. कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!