दिवे लावणे, घंटानाद, थाळीनाद करायला सांगणे हे काय देशाच्या पंतप्रधानाचे काम आहे का?

 

 

महसूल मंत्री थोरात यांचा सवाल

एका प्रसिध्द वाहिणी ला मुलाखत देतांना थोरात यांची टीका

मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारी चे संकट दिवसेंदिवस देशात वाढतच चालले आहे. या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार (३ एप्रिल) रोजी देशाच्या नावे एकसंदेश दिला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी ५ एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनावर काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सडकून एका प्रसिध्द वाहिणी द्वारे घणाघाती टीका केली आहे. थोरात म्हणाले, दिवे लावणे, घंटानाद, थाळीनाद करायला सांगणे हे काय देशाच्या पंतप्रधानाचे काम आहे का? असा संतप्त सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाचे संकट अतिशय गंभीर होत चालले असताना. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना कधी टाळ्या वाजवायला सांगतात तर कधी दिवे लावायला सांगतात. लोकांना असे आवाहन देणे हे पंतप्रधानांचे काम आहे का? नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखे कधी बोलणार आहेत का? देशाच्या हिताचे निर्णय घेणार आहेत का? आज देशभर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांना धीर देणे, मेडिकल साहित्यांचा पुरवठा करणे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष दिले पाहिजे. राज्यांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. आता तरी त्यांनी थोडं गंभीर व्हायला पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!