प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आय आय एच पी तर्फे होमिओपॅथी औषधांची विनामूल्य वितरण…

नागपूर : येथील नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपुर प्रेस क्लब आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्सच्या सयुक्त विद्यमाने, प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना असैनिक अल्बम -30 या औषधाचे विनामूल्य वितरण 26 मे 20 रोजी टिळक पत्रकार भवन येथे करण्यात आले. कोविड-19 च्या प्रकोपात सर्व जग होरपळत असताना प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हे कोरोना वॉरियर्स म्हणून पोलिस व डॉक्टरांच्या जोडीला आपले कर्तव्य बजावीत आहेत. भारत सरकारच्या आयुक्त मंत्रालयाने सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीच्या संमतीने आसैनिक अल्बम – 30 या औषधाला इम्युनिटी वाढवणारे औषध म्हणून मान्यता दिली आहे.

जे विविध संसर्ग जन्य आजाराला प्रतिबंध करणे हे औषध मोठ्या करिता ६ गोळ्या व लहानांकरिता ४ गोळ्या या प्रमाणात सकाळी उपाशी पोटी फक्त तीन दिवस द्यावयाचे आहे. त्या नंतर पुढील महिन्यात हाच डोस पुन्हा द्यावयाचा आहे. नंतरचे डोस वैद्यकीय सल्ल्याने घ्यावयाचे आहेत. डॉ. निशिकांत थापे,अध्यक्ष आय आय एच पी, महाराष्ट्र राज्य शाखा डॉ. हरिष धुरट, माजी अध्यक्ष आयआयएचपी, महाराष्ट्र विभाग यांनी ही औषधे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे सरचिटणीस यांच्या सुपूर्त केली. बोरकर यांनी आयआयएचपीने देऊ केलेल्या या करिता आभार व्यक्त केले. याप्रसंगी प्रदीप कुमार मैत्र पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपुर प्रेस क्लबचे अध्यक्ष , ब्रह्माशंकर त्रिपाठी NUWJ चे सरचिटणीस, वर्षा बाशु संघटन सचिव व कार्यकारणी सदस्य राजेंद्र दिवे यावेळी उपस्थित होते. पंचशील चौक येथील टिळक पत्रकार भवन कार्यालयात दुपारी १२ ते ५ या दरम्यान देवराव प्रधान यांच्या कडून पत्रकारांनी औषध घेऊन जावे, असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!