त्या १०१ पत्रकारांचा’कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान !

 

त्या १०१ पत्रकारांचा’कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान !

पत्रकार सुनिल शेट्टी यांना दिली श्रद्धांजली

वाडी: ज्या पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात वाचका पर्यंत कोरोना’अपडेट’ दिली. अश्या १०१ पत्रकारांचा जॉइंट एक्शन कमेटीच्या वतीने रविवार २२ नोव्हेंबर रोजी’कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला. वाडी येथील नागलवाडी भागात असलेल्या जॉइंट एक्शन कमेटीच्या कार्यालयात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सर्वप्रथम वाडी चे निर्भिड पत्रकार सुनिल शेट्टी यांना श्रद्धांजली देण्यात आली. शेट्टी यांचा कोरोना आजाराने मृत्यु झाला होता. त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आजच्या’डिजीटल’ पत्रकारितेवर’फोकस’करून भविष्यात पत्रकार हे घरोघरी राहणार असल्याचा संकेत दिला. काही मान्यवरांनी चौथा स्तंभाचे बाजारीकरण झाल्याची चिंता व्यक्त करून पत्रकाराने आपल्या लेखणीच्या माध्यमातून खरी माहिती वाचकांसमोर पोहचवावी असा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जॉइंट एक्शन कमेटी चे संस्थापक प्रल्हाद अग्रवाल तर अतिथी म्हणून भाईचारा राजमार्ग परिवहन सेवा संस्थापक अध्यक्ष नरेन्द्र मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार मिलींद किर्ती, इन-बीसीएन चे संपादक ईमरान शेख, शिवाजी असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश अग्रवाल, ट्रान्सपोर्ट चालक मानसिंग ठाकूर, सुनिल पांडे, महेन्द्र शर्मा, सुशील शर्मा, राकेश अग्रवाल, योगेश कोरडे आदी उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात नागपूर ग्रामिण व नागपूर शहर येथील १०१ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार विजय खवसे यांनी केले. दिनेश अग्रवाल यांनी आभार मानले. यावेळी सत्कार सोहळ्याला नागपूर शहर, नागपूर ग्रामिण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!