‘एनपीएस’कायद रद्द करा : मा. आमदार प्रकाश गजभिये

भारतीय रेल्वेचे खाजगीकरण व रेल्वे कर्मचा-यांचे पेंशन रद्द करणारे एन.पी. एस. कायद रद्द करा : मा. आमदार प्रकाश गजभिये

जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियनचे रेल्वे डी.आर.एम. श्रीमती रूची खरे व वरिष्ठ मंडल कारनिक अधिकारी श्री. भगत यांना निवेदन

नागपूर : भारतीय रेल्वेचे खाजगीकरण, रेल्वे कर्मचा-यांचे पेंशन रद्द करणारे एन.पी. एस. च्या विरोधात आज जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियनचे सल्लागार मा.आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात मंडल रेल प्रबंधक कार्यालय, मध्य रेल्वे, रेल्वे स्टेशन येथे धरने आंदोलन करण्यात आले.

यावेळी भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करू नये, रेल्वे कर्मचा-यांचे पेंशन रद्द करणारे एन.पी. एस. नियम रद्द करा, नवीन रेल्वे भर्ती वरील बंदी तात्काळ उठवून नव्याने भर्ती प्रक्रीया सुरू करा, शासकीय उद्योग रेल्वे मध्ये रेल्वे कर्मचा-यांचे शोषण करणारी ठेकेदारी पध्दत रद्द करा, रेल्वे कर्मचा-यांना डी.ए. न देणारे आदेश रद्द करा, देशातील रेल्वे स्टेशनचे खाजगीकरण बंद करा आदी मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर रेल्वे प्रशासनाच्या कुटनितीचा यावेळी निषेध करण्यात आला.

या संदर्भात जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत उके, महासचिव दिपक कालिंगन, बल्लारशा शाखा अध्यक्ष दिगंबर रणदिवे यांनी डी.आर.एम. श्रीमती रूची खरे व वरिष्ठ मंडल कारनिक अधिकारी श्री. भगत यांना निवेदन दिले.

यावेळी विजय गेेडाम, आशिष रामटेके, राजेश कांबळे, अनील बागडे, अजय अॅन्थनी, अमोल बनकर, धर्मपाल थूल, प्रशांत भगत, रूपेश लोखंडे, अमीत आवळे, प्रमोद सिंग, डी.डी. रणदिवे, रोशन पाटील, नागसेन लोटे, गुंजन उके, शुभम टेंर्भूणे, सुनील खोब्रागडे, महेश मिरीकर, विजय वानखेडे, लोमेश मिसाल, पंकज हानकर, मिलिंद फुळझले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!