कोरोना नसल्याचे सर्टिफिकेट पाहिजे तर दहा हजार द्या !

कोरोना नसल्याचे सर्टिफिकेट पाहिजे तर दहा हजार द्या !

नागपुरातील प्रायव्हेट पॅथालॉजी लॅब चा गोरखधंदा !

महानगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे फोफावतो आहे अवैध धंदा !

नागपूर : महामारीच्या काळात कोण कोणाची कशा प्रकारे फसवणूक करून पैसे उकळेल याचा नेमच राहिला नाही. नुकतेच काही दिवसाआधी अमरावती शहरात विमा पॉलिसीचा फायदा घेऊन रक्कम उकळण्याकरिता ज्यांना कोरोना नाही अशाही विमा धारकांना कोरोना झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाण पत्र खाजगी पॅथॉलॉजी कडून देण्यात आले असल्याचा प्रकार उघडकीस आला .

मग राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर कसे बरे मागे राहणार . असाच काही विक्षिप्त मात्र थोडा हटके प्रकार नागपुरात उघडकीस येत आहे. कोरोना च्या काळात परदेशी राहणारे बरेच नागरिक आपल्या मायदेशी परत आलेत. आणि आता परत जायचे आहे. तर काही लोकांना परदेशी नोकरी लागल्याने त्यांना रक्ताच्या चाचण्या करून कोरोना बाधित नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे.

ज्यांना परदेशात जायचे आहे ते बिचारे पॅथालॉजी लॅब मध्ये जाऊन रक्त चाचण्या करतात आणि परदेशात जायचे असल्याने रिपोर्ट लवकर देण्याची विनंती करतात आणि ह्याच ठिकाणी सावज हेरले जाते. विदेशात जाणार म्हणजे पैसेवाले पार्टी असणार हे गृहीत धरून या नोकरीवर परत जाणाऱ्या किंवा नवीन नोकरी लागलेल्या लोकांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र देण्याकरिता सरळ सरळ दहा हजार रुपयाची मागणी केली जात आहे. अडला हरी काय ना करी ? या उक्ती प्रमाणे आणि ४८ तास आधीचे प्रमाणपत्र लागत असल्याने गरजू लोक नाईलाजाने खाजगी पॅथालॉजी लॅब वाल्यांना कोरोना चाचणी निगेटिव्ह येऊन सुद्धा दहा हजार रुपये देण्यास बाध्य ठरत असल्याचा प्रकार नागपुरात घडत आहे . अश्याच एका प्रकरणात शहरातील प्रतिष्ठित दोन कोवीड चाचणी केंद्रात बोगस अहवाल देण्यात आला . ११ मार्च २०२१ ला एका इसमाने विदेशात जात असल्यामुळे ( कुठलेही लक्षण नसतांना ) आपल्यासाठी कोविड चाचणी चे सॅम्पल डॉ. दिनेश अग्रवाल यांच्या बायो पॅथ या रामदासपेठेतील नामांकित प्रयोगशाळेला दिले आणि ते स्वतः दुबईला जात असल्यामुळे त्याच दिवशी हैद्राबाद ला निघून गेले . दुसऱ्यादिवशी त्यांना दुपारी ते करोना बाधित असल्याचा अहवाल पाठविण्यात आला. वेळेवर अशी माहिती मिळाल्याबरोबर तो इसम आणि त्यांचे सर्व नागपुरातील परिवार घाबरून गेलेत. याच प्रयोगशाळेमधून एका कर्मचाऱ्याचा त्यांना फोन वर दहा हजार दिल्यास रिपोर्ट दुसरा मिळेल असे सांगणात येऊन , त्यांना त्याच दिवशी दुसऱ्या प्रयोगशाळेचा म्हणजेच मेट्रोलॅब आणि डायग्नोस्टिक सेंटर , धंतोली इथला ते हैद्राबादला असतांना त्यांना अहवाल देण्यात आला . दुबईला पोहचल्यानंतर त्यांच्या तिथल्या चाचण्यांमध्ये कुठलाही संसर्ग आढळला नाही, हे विशेष. अश्या प्रकारे संसर्ग नसलेल्या लोकांना संसर्गित दाखवून ICMR आणि महानगरपालिकेला चुकीचे आकडे देणाऱ्या आणि लोकांची पैशाने लुबाडणाऱ्या प्रयोगशाळेंवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी गुरुवार १८ मार्च रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रपरिषदेत करण्यात आली आहे. खाजगी इस्पितळांच्या आणि चाचणी केंद्रातील वाढीव बिलासंबंधी आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यासाठी प्रत्येक कोवीड रुग्णालयांच्या बाहेर शासन मान्य दर फलक लावावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कडून २६ ऑक्टोबर २०२० पासून सातत्याने करण्यात येत आहे. परंतु नागपूर महानगर पालिका या संदर्भात नागरिकांसाठी गंभीर नसल्याची दिसून येत आहे . लोकांच्या भीतीग्रस्त मानसिकतेचा फायदा घेऊन पैसे उकळण्याचा गोरखधंदा नागपुरात जोरात सुरु असून आय एम ए , महानगरपालिकेने ने जातीने लक्ष देण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रवक्ता व शहर उपाध्यक्ष श्रीकांत शिवणकर, विशाल खांडेकर, अशोक काटले, मेहबूब पठाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!