कोरोना मुळे नाही, डॉक्टरांच्या हलगर्जी पणा मुळे रवी खोब्रागडेंचा मृत्यु झाला !

कोरोना मुळे नाही, डॉक्टरांच्या हलगर्जी पणा मुळे रवी खोब्रागडेंचा मृत्यु झाला !

भीम आर्मी कलाकार संघटनेचा आरोप

शासनाने रवी खोब्रागडेंच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करावी

नागपूर : रवी खोब्रागडे या तरुण कलावंताचा मृत्यु कोरोना मुळे झाला नसून डॉक्टरांच्या हलगर्जी पणा मुळे त्याचा मृत्यु झाला आहे. असा आरोप भीम आर्मी कलाकार संघटना नागपुर शहर अध्यक्ष सुनिल गाडगे यांनी केला आहे. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत करण्याची मागणी हि गाडगे यांनी केली आहे.

रवी खोब्रागडे यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना २३ मार्च २०२१ रोजी मेयो रुग्णालयात उपचारा साठी नेण्यात आले. डॉक्टरांनी रवी याला भर्ती होण्याचा सल्ला दिला. त्याला ताप असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. तीन दिवसात रवी याला बरे वाटायला लागले. त्याने परिवाराला २६ मार्च ला मोबाईल द्वारे प्रकृती स्थिर असून सुटी मिळणार असल्याचे कळवले. मात्र अचानक २७ मार्च ला रवी चा मोबाईल बंद दाखविल्याने परिवाराची चिंता वाढली. डॉक्टरांशी परिवाराने संपर्क साधला असता डॉक्टरांनी रवीचा कोरोना आजारा मुळे मृत्यु झाल्याचे सांगितले. रवी चा मृत्यु कोरोना आजारा मुळे झाला नाही. रवी ने मृत्युच्या तीन दिवसांपूर्वी प्रकृती बरी झाल्याचे मोबाईल ने कळविले होते. सुटी होणार असल्याचे हि सांगितले होते, असे गाडगे यांनी सांगितले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रवी चा मृत्यु झाला आहे, असा दावा हि गाडगे यांनी केला आहे. रवी हा एक चांगला कलावंत होता. तो कलेच्या माध्यमातून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु आता रवी चा मृत्यु झाल्यामुळे रवीच्या परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कोरोना मुळे रवीचा मृत्यु झाला नसुन डॉक्टरांच्या हलगर्जी पणा मुळेच त्याचा मृत्यु झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रवीच्या मृत्यु प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मी कलाकार संघटनेचे नागपुर शहर अध्यक्ष सुनिल गाडगे यांनी केली आहे. तसेच शासनाने रवीच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करावी, अशी हि मागणी गाडगे यांनी निवेदना द्वारे केली आहे. रवीच्या मृत्यु मुळे त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून दानदात्यांनी रवीच्या परिवाराला आर्थिक मदत करावी. ज्या दानदात्यांना आर्थिक मदत करायची असेल त्यांनी ममता रवी खोब्रागडे यांच्या 9307417142 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून त्यांच्या भारतीय स्टेट बँक खाता क्रमांक 39494962614 IFSC. SBIN00005461 यावर मदत करावी, अशी विनंती रवीच्या कुटूंबियांनी केली आहे.

error: Content is protected !!