महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघीणीला कोरोना चे लक्षण !

महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघीणीला कोरोना चे लक्षण !

नागपूर : येथील महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील जान नावाच्या वाघीणीला सर्दी, खोकला, ताप झालेला आहे. वाघीणीची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अध्याप रिपोर्ट मिळालेला नसल्याची माहिती आहे. पण वाघीणीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव असल्याची माहिती महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी वाटसप च्या माध्यमातून दिली आहे.

महाराजबाग प्राणिसंग्रहालयात जान नावाची वाघीण पिंजरा बंद आहे. मंगळवार १८ मे रोजी अचानक वाघीणीला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आढळले. त्यांनी लागताच वाघीणीचे नमूने तपासणी साठी पाठवले. लक्षणे कोरोना चे असल्यामुळे महाराजबाग प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधला असता, त्यांनी वाघीण स्वस्थ्य असल्याची माहिती दिली. पण कोरोना चाचणी चा रिपोर्ट यायचा असल्याचे सांगितले. २३ जानेवारी २००९ रोजी जान वाघीणीला चंद्रपूर येथील जूनोना परिसरातून आणले होते. त्यावेळी हि वाघीण अवघ्या १५ दिवसांची होती. महाराजबाग प्राणिसंग्रहालयात इतरही वन्यजीव वास्तव्यास आहेत. त्यांची पावलो पावली देखरेख व आरोग्याची काळजी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर घेत असतात. जान वाघीन हि स्वस्थ असल्याचे डॉ. बावस्कर यांनी सांगितले. पण कोरोना तपासणीचा रिपोर्ट यायचा असल्याचे हि ते बोललेत. त्यांनी असे हि सांगितले की वाघीणी ला कोरोना नाही, रिपोर्ट निगेटिव येणार असल्याचे ठाम पणे सांगितले. वाटसप च्या माध्यमातून डॉ. बावस्कर यांनी वाघीणी चा कोरोना रिपोर्ट निगेटिव असल्याचे कळविले आहे. पण अध्यापही माध्यमांमध्ये वाघीणी च्या आरोग्यासंदर्भात संभ्रम आहे.

error: Content is protected !!