ट्रेनच्या धडकेत वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्हयातील जुनोना-मामला येथील घटना

गोंदिया=बल्लारशा ट्रेन ने झाला अपघात

भीमराव लोणारे

विशेष बातमी : चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना-मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन्ही बछडे अंदाजे सहा महिन्यांचे असून मादी आहेत. विशेष सांगायचे म्हणजे या रेल्वे मार्गावर आतापर्यंत अनेक वन्यजीवांचा बळी गेलेला असून ट्रेनचा वेग अधिक असतो.

जुनोना या वनपरिक्षेत्रात एक वाघीण आपल्या दोन बछड्यांसोबत रेल्वे ट्रॅक ओलांडत होती. त्यावेळी बल्लारशावरुन गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीने या दोन बछड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही बछड्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. गुरुवार (१५ नोव्हेंबर) पहाटे ची ही घटना आहे. बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूला अतिशय घनदाट वनपरिक्षेत्र आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना आतापर्यंत अनेक वन्यजीवांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झालेला आहे. या रेल्वे ट्रॅक वरती वन्यजीवांचे प्राणवाचावे यासाठी वन्यप्रेमींनी अनेकदा वनविभागाच्या लक्षात आणून दिले होते. मात्र वनविभागाने अध्यापही कुठलीच उपाययोजना केली नसल्याने वनविभागच वन्यजीवांच्या जिवावर बेतला आहे, असा आरोप वन्यप्रेमींनी केला आहे.

2 thoughts on “ट्रेनच्या धडकेत वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!