महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघीणीचा RT PCR टेस्ट निगेटिव्ह

महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघीणीचा RT PCR टेस्ट निगेटिव्ह

नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील जान वाघीणीचा RT PCR टेस्ट अखेर निगेटिव्ह आलेला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर ने मध्यरात्री १.१९ वाजताच्या सुमारास जान चा कोरोना टेस्ट रिपोर्ट जाहीर केला आहे.

महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील जान नावाच्या वाघीणीला चार दिवसांपूर्वी सर्दी झालेली होती. तिच्या नाकातून पाणी वाहत होते. महाराजबाग प्रशासनाला वाघीण अस्वस्थ असल्याचे लक्षात येताच, त्यांनी लगेच या संदर्भात वरिष्ठांना कळविले.

लक्षण गंभीर असल्यामुळे महाराजबाग प्रशासनाने जान वाघीणी ची १९ मे दुपारी १३. १० वाजता RT PCR टेस्ट केली. मध्यरात्री म्हणजेच २१ मे रोजी १. १९ वाजता जान वाघीणीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर ने जाहीर केले. त्यानंतर, महाराजबाग प्रशासनाने सुखाचा श्वास घेतला. मात्र अध्यापही वाघीण अस्वस्थच असल्याची माहिती आहे. वाघीणी चे वय १२ वर्षांचे असून २३ जानेवारी २००९ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील जूनोना परिसरातून जान वाघीणीला महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणले होते. त्यावेळी जान वाघीण अवघ्या १५ दिवसांची होती. महाराजबाग प्रशासनाने लहान मुला सारखे या वाघीणी चे संगोपण केले. आज ती वाघीण १२ वर्षांची झालेली आहे. वाघीणीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असलातरी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर त्या वाघीणीच्या हालचाली कडे बारकाईने लक्ष देत आहेत.

error: Content is protected !!