अॅग्रोव्हिजनचा दशकपुर्ती सोहळा २३ नोव्हेंबर पासून

अॅग्रोव्हिजनचा दशकपुर्ती सोहळा २३ नोव्हेंबर पासून

नागपूर : विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्वाचे माध्यम व शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन येत्या २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान नागपूरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
दहाव्या अॅग्राव्हिजन कृषी संमेलनाचे उदघाटन २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उदघाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री (भारत सरकार) राधामोहन सिंह, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या अॅग्रोव्हिजन सोहळ्याचे कृषी ज्ञान, तंत्रज्ञान, कार्यशाळा, अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरण, कृषीविषयक ताज्या विषयावरील चर्चासत्र, पशु प्रदर्शन, अॅग्रीथॉन आणि बळीराज्याच्या गौरवाचा अॅग्रोव्हिजन अवार्ड सोहळा आदी या प्रदर्शनाचे खास वैशिष्टये राहणार आहेत. २४ नोव्हेंबर रोजी “विदर्भातील दुग्धव्यवसायाचा विकास” तसेच २५ नोव्हेंबर रोजी “बांबू उत्पादन व संधी” या विषयांवर एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!