उपराजधानी नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, आरोपीने लावला गळफास

 

 

उपराजधानी नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, आरोपीने लावला गळफास

नागपूरः परिवारातील पाच व्यक्तींचा खुन करुन आरोपीने स्वताला ही गळफास लावून संपविल्याची खळबळ जणक घटना उपराजधानी नागपुरातील पाचपावली परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.

आरोपीने पत्नी, मुलगा, मुलगी, सासू मेहुणीची हत्या केली आहे. त्यानंतर, आरोपीने घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून आरोपी ने हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीसांमार्फत व्यक्त केला जात आहे.

आलोक माथुरकर असे आरोपीचे नाव आहे. आलोक ने पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल यांची त्याच्या स्वतःच्या घरात, तर शंभर फुटावर रोडच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या घरात सासु लक्ष्मी देविदास बोबडे आणि मेहुणी अमिषा यांची निर्घुण हत्या केली आहे. आरोपी ने सासू आणि मेहुणीला गळा चिरून ठार मारले तर पत्नी, मुलगी, मुलाची डोक्यावर हातोड्याने फटके मारून हत्त्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला.

४८ वर्षीय आलोक हा टेलरिंगचे काम करीत होता. गोळीबार चौकात तो भाड्याच्या खोलीत रहात होता. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आलोकचे मेहुणीसोबत प्रेम संबंध होते. त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होत होता. यावरून नेहमी पती-पत्नीमध्ये वाद होत होता

या वादाची परिणिती काल रात्री कडाक्याच्या भांडणात झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आलोक रविवारी रात्री जवळच राहणाऱ्या सासू लक्ष्मी यांच्याघरी गेला. तिथे त्याने सासू लक्ष्मी आणि मेहूणी अमिषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवे मारले. त्यानंतर तो रात्री घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने पत्नी, मुलगा व मुलगी या तिघांना ठार मारले. त्यानंतर सकाळच्या सुमारास आलोकने सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना पहाटेच्यावेळी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुपारी १२च्या दरम्यान या घटनेचे वृत्त आगी सारखे शहरात पसरले त्यानंतर उपराजधानी नागपुरात या भयानक हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. शेजारच्या लोकांना घरातून आवाज आला नसल्याने संशय आल्यानंतर त्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना सर्वांचे मृतदेह दिसले. शेजाऱ्यांनी या बाबत तहसील पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत. पण या घटनेमुळे नागपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!