बहुचर्चित  कांबळे दुहेरी हत्यांकाड प्रकरण :  सर्वोच्च न्यायालयाने आरोपी अंकित शाहु चा जामीन अर्ज फेटाळला

बहुचर्चित  कांबळे दुहेरी हत्यांकाड प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने आरोपी अंकित शाहु चा जामीन अर्ज फेटाळला

31डीसेंबर 2021 च्या पुर्वी पर्यंत खटला संपविन्याचे आदेश दिले

खटला संपला नाहीतर आरोपीला उच्च न्यायालयात नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याचा राहणार अधिकार

दिल्ली/ नागपुर* – महाराष्ट्रातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्यांकाड नागपुर शहरात 17 फेब्रूवारी 2017 ला घड़लेले होते, उषाबाई कांबळे व त्यांची दिढ वर्षाची नातीन राशी कांबळे यांचा अमानुष पने गळा कापुन हत्या करण्यात आली असुन त्यांची बॉडी घटना स्थळा पासुन तीन किलोमीटर च्या अंतरावर विहिरगाव च्या नाल्यात पोत्यामध्ये भरून फेकन्यात आली होती ,त्या प्रकारणामध्ये त्यातील आरोपी क्रमांक चार अंकीत शिवबरण शाहु याने त्यास जामीन मिळावा म्हणून सेशन कोर्टात व त्यानंतर मा. उच्च न्यायालय, नागपुर खंडपीठ येथे जामीन मिळन्या करीता बरेच अर्ज दाखल केले, परंतु त्यास जामीन मिळत नसल्याने त्याने मा. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 28 ऑक्टोम्बर 2020 पासून जामीन प्रकरण मा. सर्वोच्च न्यायालय नवि दिल्ली येथे प्रलंबित होते. आज रोजी मा. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. आरोपी व सरकारी अभियोक्ता यांनी युक्तीवाद केला . मा. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद एैकुन आरोपी ची जामीन अर्ज नामंजुर करुण फेटाळून लावली, तसेच निर्णयात नमुद केले की, डिसेंबर 2021 पर्यंत खटल्याची सुनावणी ट्रायल कोर्टात पूर्ण करावी.दिलेल्या मुदतीत खटल्याची सुनावणी झाली नाहीतर आरोपी हा जामीन मिळण्याकरीता उच्च न्यायालयात अर्ज करू शकतात , नमुद जामीन अर्ज उच्च न्यायालयाने कायद्याच्या अनुशंगाने निकाली काढावा असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारीत केले , सदर प्रकरणात शाषनातर्फे जेष्ठ विशेष सरकारी अभियोक्ता उज्वल निकम यांनी सत्र न्यायालयात अद्याप आठ साक्षदारांची सरळ तपासणी घेतलेली आहे तसेच मा. सर्वोच्च न्यायालयात आरोपी तर्फ अधिवक्ता ऋषीकेश चितले यांनी आरोपीची जामीन मिळणे करीता युक्तीवाद केला.तसेच महाराष्ट्र शासना तर्फे प्रमुख सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र सदन, नवि दिल्ली अधिवक्ता राहुल चिटणीस, अधिवक्ता सचिन पाटील व फिर्यादी रविकांत सेवकदास कांबळे यांच्या कडून अधिवक्ता सचिन पुजारी, जेष्ठ अधिवक्ता राजेंद्र डागा व अधिवक्ता समिर सोनवने यांनी आपली बाजु मांडली पोलिस विभागातर्फे एसीपी कोतवाली व नायक पोलिस कॉन्स्टेबल हर्षदीप खोब्रागडे यांनी कामकाज पाहिले .

error: Content is protected !!