कडबी चौक ते गोलीबार चौक रेल्वे उड्डाणपुला चे भूमिपूजन

केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे सहकार्याने काम करण्याची गरज: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर: केंद्र आणि राज्य सरकारने विकासाची कामे एकत्रितपणे सहकार्याच्या भावनेतून करावे, यात राजकारण नकोच, अशी भावना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली. नागपूर येथील कडबी चौक ते गोलीबार चौक या नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आपले मत व्यक्त केले. या मंगलमय भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मंत्री सुनिल केदार, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार कृपाल तुमाणे यांच्यासह नागपूर शहरातील विविध मतदार क्षेत्राचे आमदार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पूढे म्हणाले, की सहकार्याचा मार्ग कधीच नॅरोगेज नसावा, तो सदैव ब्रॉडगेजच असायला हवा, असा टोलाही केंद्र सरकारला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. राज्यात अतिवृष्टी, वादळ, महापूर हि संकटे वारंवार येत आहेत. त्यामुळे तात्कालिन काम न करता कायमस्वरुपी काम करण्याची गरज आहे. मग कितीही पाऊस पडला तरी त्याला कुठलाच बाधा येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. एवढेच नाहीतर विकासाची कामे करीत असताना पर्यावरणाला कुठलीच इजा पोहचणार नाही, याची खबरदारी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना म्हणाले, की मला तुमच्या समस्त टेक्नॉलॉजीची मदत हवी आहे. नितीन गडकरीजी आज मला तुमची गरज आहे. देशावरच नव्हेतर संपूर्ण जगावर आज कोरोना महामारी चे संकट आहे. यातच आता नैसर्गिक आपत्ती येत आहे. सुरवातच तौक्ते वादळाने झाली. पूर, अतिवृष्टी ने महाराष्ट्र हादरला आहे. पण असो, कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते, पूर यातून आपण नक्कीच सावरू असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला.

error: Content is protected !!