पेंच व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय रेंजर दिन साजरा

पेंच व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय रेंजर दिन साजरा

नागपूर: येथील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने सिल्लारी येथील अमलतास निसर्ग निर्वाचन केंद्र येथे आंतरराष्ट्रीय रेंजर दिन साजरा करण्यात आला. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे चर्चा सत्र यावेळी आयोजित करण्यात आले होते. वन अधिकारी, कर्मचारी यांनी रेंजर दिनावर प्रकाश टाकून या दिनाचे महत्व सांगितले.
चर्चा सत्राच्या अध्यक्षस्थानी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ला उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना अतुल देवकर यांनी मांडली. ते, म्हणाले, ३१ जुलै रोजी जागतिक रेंजर दिन साजरा केला जातो. वन्यजीव व वने यांचे संरक्षण करताना ज्यांनी आपले बलिदान दिले, शहिद अथवा जखमी झालेत, अश्या वन सैनिकांची आठवण व त्यांचा गौरव म्हणून हा जागतिक रेंजर दिन साजरा केला जातो. त्यांनी वनअधिकारी, कर्मचारी यांना उपरोक्त दिनाच्या शुभेच्छा हि दिल्यात. कार्यक्रमाला पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, प्रियदर्शनी बाभळे, विजय सूर्यवंशी, अनिल भगत आदी उपस्थित होते. संचालन मंगेश ताटे यांनी केले तर अनिल भगत यांनी आभार मानले.

error: Content is protected !!