टिळक पत्रकार भवन परिसरात ध्वजारोहण

टिळक पत्रकार भवन परिसरात ध्वजारोहण

नागपूर: नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीन पंचशील चौक येथील टिळक पत्रकार भवन परिसरात ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, सरचिटणीस ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोविड नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचा समारोप अल्पोआहाराने करण्यात आला. यावेळी महेंद्र आकांत, सुरेश कनोजीया, निलेश देशपांडे, चंद्रकांत अणेकर, राहुल अवसरे, कृष्णा मस्के आदी उपस्थित होते. या मंगल सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नागपूर प्रेस क्लब, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, विश्वास इंदुरकर, जोसेफ राव, प्रभाकर दुपारे, भूपेंद्र गणवीर, विनोद देशमुख यांनी प्रयास केला.

error: Content is protected !!