गीनिज ग्रुपने उलगडला ‘1970 – 1990′ चा संगीतमय प्रवास !

गीनिज ग्रुपने उलगडला ‘1970 – 1990′ चा संगीतमय प्रवास !

नागपूर: हिंदी चित्रपट जगतामध्ये 1970 ते 1990 या दोन दशकांच्या कालावधीत अनेक सुमधूर गीते तयार झाली. त्या गीतांची मोहिनी आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. अशाच काही लोकप्रिय गीतांचा प्रवास गीनिज ग्रुपच्या गायकांनी उलगडत नेला आणि कार्यक्रम रंगत गेला.
गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड म्युझिकल ग्रुप द्वारा ‘द जर्नी 1970 – 1990 ‘ हा संगीतमय कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला. सांस्कृतिक सेलिब्रेशन लॉन, धाबा चौक येथून फेसबुक लाइव्ह केल्या गेलेल्या या या कार्यक्रमाचे आयोजन गायक मनीष पाटील यांनी केले होते.
या कार्यक्रमात सूरज शर्मा, किशोरी गणवीर, भीमराव लोणारे, भगवान लोणारे, मनीषा राऊत यांनी विविध गीते सादर केली.
सूरज शर्मा यांनी लगी आज सावन की या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करून श्रावणातील आल्हाददायक वातावरणात अधिक भर घातली. मनीष पाटील यांनी ये जमी गा रही है, फुलों का तारों का, दिल दिवाना अशी एकाहून एक बहारदार गीते सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. भीमराव लोणारे यांनी आज मौसम बडा हे गीत सादर करीत आधीच तयार झालेल्या वातावरणातला अधिक आनंदी केले. प्रवीण भिवगडे यांनी रातकली एक ख्वाब तर भगवान लोणारे यांनी ओ मेरे दिल के चैन हे गीत सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. मनीष राऊत यांनी दिल तो है दिल या गीताला स्वरसाज चढवला. गायकांनी ए जिंदगी गले लगा ले, ए मेरे हमसफर, प्रितीचं झुळझुळ पाणी, तुने ओ रंगीले, गोरी तेरा गाव, देखा है पहली बार अशी एकाहून एक सरस गीते सादर केली. या कार्यक्रमाच्या संचालनाची धुरा गायक प्रवीण भिवगडे यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली.

error: Content is protected !!