लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद २४ ऑक्टोबरला नागपूरात

लोकमत नागपूर सुवर्ण महोत्सव

लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद २४ ऑक्टोबरला नागपूरात

गुरुदेव श्री श्री रवि शंकर, स्वामी रामदेव यांच्यासह मान्यवर धर्माचार्यांची उपस्थिती

नागपूर- लोकमत माध्यम समूहाची मातृसंस्था, नागपूर आवृत्ती यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असून या निमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेतील पहिला कार्यक्रम, येत्या रविवारी, २४ ऑक्टोबर २०२१ रोजी नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद हा या मालिकेतील पहिला कार्यक्रम आहे. शहरातील ग्रेट नाग रोडवरील कविवर्य सुरेश भट सभागृहात रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रारंभ होणान्या या आंतरधर्मीय परिषदेची थीम

“सामाजिक सौहार्द भारताची भूमिका आणि वैश्विक आव्हाने ही आहे. या परिषदेला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र

विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस व नागपूरचे महापौर श्री दयाशंकर तिवारी उपस्थित राहतील. बंगळुरु येतील दी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते मा. गुरुदेव श्री श्री रवि शंकर हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक नवी दिल्लीच्य अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक मा. आचार्य डॉ. लोकेशमुनी, अजमेर शरीफ दरगाहर्च गढ़ी नशिन मा हाजी सईद सलमान चिश्ती, मुंबईच्या जीवनविद्या मिशनचे संस्थापक मा. प्रल्हाद वामनराव पै मुंबईचे आर्चबिशप मा. कार्डिनल औस्वाद गेसियस, लेह-लडाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक मा भिख्खू संघसेना आणि बीएपीएस स्वामिनारायण संस्थेचे धर्मगुरू मा बहमविहारीदास स्वामी या धर्माचार्याच्या पवित्र आभामंडळाने ही परिषद आल्हादित होणार आहे. मा. ब्रह्मविहारीदास स्वामी विशेषत्त्वाने या महत्त्वाच्या परिषदेसाठी अमेरिकेतून येत आहेत.

लोकमत माध्यम समूहाने नेहमीच सर्व धर्म व पंथांचा समान आदर केला आहे. धर्मनिरपेक्षता व सांप्रदायिक सलोखा निर्माण करण्याच्या

मार्गावर लोकमत माध्यम समूह कायम अग्रेसर राहिले आहे. सर्वधर्म समभाव म्हणजेच सर्व धर्म-पंथांसाठी समान आदर, हेच ब्रीदवास्य या

समूहाचे राहिले आहे, हे येथे नमूद करणे योग्य ठरेल.

आज जगपातळीवर सर्वच ठिकाणी धर्माच्या नावाखाली विशेष लोकांना लक्ष्य केले जात आहे. त्याचा छळ केला जात आहे आणि पिटाळून

लावले जात आहे. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी हत्येसारखी पातकी कृत्येही केली जात आहेत. जेव्हा अशा दुर्देवी व निदनीय घटना विनाशासन घडत असतात, तेव्हा भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाची भूमिका महत्त्वाची असते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या देशाल शतकानुशतके सर्व धर्म-पंथीय लोक एकोप्याने, सलोख्याने राहत आहेत. आपल्या वैदिक संस्कृतीने आपल्याला ‘वसुधैव कुटूंबकचा मंत्र दिला आहे. याचा अर्थ पृथ्वीवर नांदणारे सर्व लोक एक कुटूंब आहेत. आपली संस्कृती ही प्रेम करुणा व बंधुत्त्वाची आहे भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध, गुरु गोविंदसिंह, महात्मा गांधी या सर्वांनी एकच संदेश दिला आणि त्या तत्त्वाचा सर्वत्र प्रसार केला जागतिक बंधुत्त्वाला बळकटी देणे, हाच एकमेव उद्देश या परिषदेचा आहे. नागपुरातून प्रसवलेली विश्वबंधुत्त्वाची घोषणा संपूर्ण जगापर्य पोहोचावी आणि प्रेम, शांती व सांप्रदायिक सौहार्द्राचा संदेश जनामनात प्रवेश करावा, हीच भावना या परिषदेच्या आयोजनामागची आहे

वर्तमानातील संदर्भात भारताची भूमिका काय आहे आणि हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र जगात धार्मिक सौहार्द व शांतता प्रस्थापित करण्यासाठी

योगदान देऊ शकते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच लोकमत माध्यम समूह धार्मिक नेते व धर्माचार्यांना या परिषदेसाठी

आमंत्रित करित आहे या संदर्भात त्यांचे मार्गदर्शन संपूर्ण जगात सांप्रदायिक सौहार्द व शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवेल. ही आम्हाला आशा आहे.

 

error: Content is protected !!