‘माफसु’ने दत्तक घेतलेले गाव पोरके !

‘माफसु’ने दत्तक घेतलेले गाव पोरके !

भीमराव लोणारे / जितेंद्र धाबर्डे

नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसु) ने उन्नत भारत अभियाना अंतर्गत महाराष्ट्रातील दत्तक घेतलेले ३० गाव हे पोरके झालेले आहेत. त्यापैकी, मंत्री सुनील केदार यांच्या मतदार क्षेत्रातील म्हणजेच कळमेश्वर तालूक्यातील पाच गावांचा समावेश आहे.

‘माफसु’ने उन्नत भारत अभियाना अंतर्गत २०२० यावर्षी राज्यातील ३० गावे दत्तक घेतली. यामध्ये कळमेश्वर तालूक्यातील सोनूली, निलगाव, कन्हैयाडोल, पळसोडी, कानोवाडी या गावांचा समावेश आहे. यापैकी, सोनूली या गावात’माफसु’ने विविध उपक्रम राबविलेत. पण त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. चार गावे अध्यापही दत्तक घेऊन पोरकेच आहेत. विद्यापीठा चे कुलगुरु कर्नल (डॉ.) प्रा. आशिष पातुरकर यांनी या अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याचे मंगळवार (९ नोव्हेंबर) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. पण त्यांनी दिलेली माहिती अपूर्ण आहे. अध्याप अभियान त्या गावात प्रभावी पणे राबविल्या जात नसून माफसू ने दत्तक घेतलेली गावे आजही पोरकी आहेत. ही चिंतेची बाब आहे. मंत्री सुनील केदार यांनी या दत्तक गावांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!