मातोश्री रमाई उद्यान येथे महामानवास अभिवादन

मातोश्री रमाई उद्यान येथे महामानवास अभिवादन

नागपूर : लघुवेतन कॉलनी येथील मातोश्री रमाई उद्यान परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले.

बुद्ध वंदना घेऊन वसाहतीतील नागरिकांनी महामानवास अभिवादन केले. यावेळी स्वप्नील भालेराव, विजय शेवाळे, सुरज राऊत, विजय गजभिये, सुशील कराडे, विजय कराडे, कृष्णा डोमके, विकास गोडबोले, ज्योती भालेराव, सरस्वती रायबोले, वैशाली गोडबोले, सुनीता मसराम, ज्योती शेवाळे, श्रेयसी भालेराव, विजय खापर्डे, अशोक मोटघरे, देवचंद ढोबळे, कैलाश बरोहा आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!