कर्जबाजारी पती ने पत्नी, दोन मुले यांची हत्या करुन केली आत्महत्या !

कर्जबाजारी पती ने पत्नी, दोन मुले यांची हत्या करुन केली आत्महत्या !

जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील चित्तथरारक घटना

नागपूर: कर्जबाजारी झाल्यामुळे पत्नी व दोन चिमुकल्या मुलांची हत्या करुन पती ने गळफास लाऊन आत्महत्या केली. जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील भीम चौक दयानंद पार्क जवळील हि चित्तथरारक घटना आहे. मंगळवार (१८ जानेवारी) दुपारी ४ वाजता घटना उघडकीस आली. मृतकांमध्ये मदन अग्रवाल (४०), पत्नी किरण अग्रवाल (३३), मुलगा ऋषभ अग्रवाल, मुलगी टिया अग्रवाल (५) यांचा समावेश आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन अग्रवाल यांचे घरा शेजारी चायनिस चे दुकान होते. मदन याला क्रिकेट सट्टा, जुगार चा नाद होता. त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते. २५ ते ३० लाखाच्या जवळपास मदन वरती कर्जाचा बोझा होता. नेहमी मदन मानसिक तनावात असायचा, असे शेजाऱ्यांमध्ये चर्चा होती. यापूर्वी हि मदन ने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री मदन ने पत्नी किरण व मुले झोपी गेल्यानंतर पत्नी किरण व दोन्ही मुलांची चाकू ने सपासप वार करुन हत्या केली. त्यानंतर, गळफास लाऊन मदन ने आत्महत्या केली. अशी माहिती, पोलीसांनी प्राथमिक तपासा दरम्यान दिली. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मदनचा मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी आला. मित्राने दार ठोकले पण घराच्या आतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे, मित्राने शेजाऱ्यांना मदन संदर्भात विचारपूस केली. शेजाऱ्यांनी मदन व त्याचा परिवार सोमवारी सकाळ पासून दिसला नसल्याची माहिती दिली. मदनचे दार आतून बंद असून दार ठोकल्यानंतर हि कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे कळताच शेजाऱ्यांनी पोलीसांना या संदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त चिन्मय पंडित, परिमंडळ ५ चे उपायुक्त मनिष कलवानिया, जरीपटका पोलीस स्टेशन चे प्रभारी PI भीमा नरके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. चारही मृतदेह ताब्यात घेऊन पोलीसांनी खुनाचा व आत्महत्येचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

error: Content is protected !!