एक थी शेरनी और एक भेडियों का झुंड…’, संजय राऊत यांच्या ट्वीटवर कंगनाची तिखट प्रतिक्रिया

मुंबई, 04 नोव्हेंबर: प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रणौतविरोधात (Kangana Ranaut) मानहानीची तक्रार (Defamation Case) दाखल केली आहे. याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटवर कंगनाने चोख उत्तर दिले आहे. कंगनाने अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर जावेद अख्तर यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देत जावेद अख्तर यांनी आता कोर्टामध्ये धाव घेतली आहे. यावर आता अभिनेत्री कंगना रणौतने देखील खास तिच्या शैलीत उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे कंगनाने संजय राऊत (Sanjay Raut) यांचे ट्वीट शेअर करत चोख उत्तर दिले आहे.
अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘एक थी शेरनी….और एक भेड़ियों का झुंड’. जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले होते. त्यावर उत्तर देताना कंगनाने हे ट्वीट केले आहे. एकाच वेळी तिने संजय राऊत आणि जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे.