नागपूरात भारत बंद ला अल्प प्रतिसाद

EVM मशिनच्या प्रतिकृतीची संविधान चौकात होळी

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

नागपूर : संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार (५ मार्च) रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंद ला नागपूरात अल्प प्रतिसाद मिळाला. संविधान चौकात आंदोलन कर्त्यांच्या वतीने EVM मशिनची होळी करण्यात आली. या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

                     संविधान चौकात तैनात पोलिस

संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने चार चरणांमध्ये देशात आंदोलन करण्यात आले. २७ जानेवारी ते ५ मार्च दरम्यान वेगवेगळ्या स्वरुपात आंदोलन करण्यात आले. २७ जानेवारी रोजी जिल्हास्तरावर एक दिवसीय धरणा प्रदर्शन करण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजी तालूका स्तरावर धरणा प्रदर्शन करण्यात आले. १७ फेब्रुवारी रोजी ब्लॉक स्तरावर धरणा प्रदर्शन करण्यात आले. ५ मार्च रोजी भारत बंद पुकारण्यात आला.

          EVM मशिन ची प्रतिकृती जाळताना आंदोलक

(मंगळवार ५ मार्च) रोजी भारत बंद दरम्यान संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने उत्तर नागपूरातील भीम चौक येथून समन्वयक प्रो. बी. एस. हस्ते यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. दहा टक्के आर्थिक आधारावर आरक्षणाच्या विरोधात, EVM मशिनच्या विरोधात, दलित-आदिवासींच्या हक्का साठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. भीम चौक, जरीपटका बाजार, बाराखोली, इंदोरा चौक, कमाल चौक, लष्करीबाग, दहा नंबर पुल, कडबी चौक, नंगा पुतळा चौक, गांधी पुतळा सीए रोड, महाल शिवाजी पुतळा, जगनाडे चौक, बैद्यनाथ चौक, मोक्षधाम, कॉटन मार्केट चौक, रामझुला, रेल्वे स्टेशन चौक, एलआयसी चौक, व्हिसीए चौक, महाराजबाग चौक, व्हेरायटी चौक, शनी मंदिर, श्याम हॉटेल, धंतोली, लोकमत चौक, पंचशील चौक, व्हेरायटी चौक, झिरो माईल, संविधान चौक

                  संविधान चौकात रॅली चे आगमन

असा या रॅलीचा मार्ग होता. संविधान चौक येथे रॅलीचे रुपांतर सभेत करण्यात आले. अनेक मान्यवरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दलित=आदिवासी विरोधी धोरणाचा निषेध करुण EVM मशिनच्या प्रतिकृती ची होळी केली.

error: Content is protected !!