सत्तापक्ष विकास निधी देण्यास टाळाटाळ करतो : नगरसेवक घोडेस्वार

भीमराव लोणारे

नागपूर : केंद्रात, राज्यात व नागपूर महानगर पालिका येथे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना या सत्ताधाऱ्यांपासून विकास निधी खेचून आणण्यास भलताच त्रास होत असल्याचे प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी IBMTV9 न्यूज पोर्टल शी बोलताना सांगितले. सत्ताधाऱ्यांचा एवढा त्रास असतानाही दोन वर्षात प्रभागाचा अंदाजे चारही नगरसेवक मिळून १६ कोटींचे विकास कामे केली असल्याचे घोडेस्वार यांनी सांगितले.

उत्तर नागपूरात भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉ. मिलिंद माने आहेत. प्रभाग ६ येथे सर्वाधिक स्लम वसाहती आहेत. माझ्या प्रभागातील एकही स्लम वसाहतींचा आमदार डॉ. माने यांनी विकास केला नसल्याचे घोडेस्वार म्हणाले. प्रभाग क्रमांक ६ येथे चार नगरसेवक आहेत. चारही नगरसेवक बसपाचे आहेत. जितेंद्र घोडेस्वार, वंदना चहांदेकर, वैशाली नारनवरे, मो. इब्राहिम टेलर असे या प्रभागातील नगरसेवकांची नावे आहेत.

एकट्या घोडेस्वार यांनी प्रभागाच्या विकासकामासाठी अंदाजे ७ कोटींचा निधी खेचून आणला. यादवनगर, जयभीम चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. हा पुतळा परिसर सुंदर व सुशोभित करण्याच्या नावावर आजी=माजी आमदारांनी अनेकदा भूमिपूजन केले. परंतु वर्षानु वर्ष लोटूनही महामानवाचा पुतळा परिसर विकासाच्या प्रतिक्षेत होता. अखेर नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी ३९ लाखांचा नगरसेवक फंड खेचून आणला. २५ लाखांचा पहिला टप्पा मिळाला. महामानवाच्या पुतळा परिसराचे युध्दस्तरावर काम सुरु आहे.

महामानव डॉ. आंबेडकरांचा पुतळा असा सुशोभित व सुंदर बनणार

पक्षाने जर घोडेस्वार यांना उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राची आमदार कि ची उमेदवारी दिली तर ते निवडणूक लढणार, अशी इच्छा घोडेस्वार यांनी व्यक्त केली. प्रभाग ६ पाच वर्षात आदर्श प्रभाग बनविण्याचा संकल्प जितेंद्र घोडेस्वार यांनी केला आहे.

error: Content is protected !!